खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीत बेळगांव पदवीधर मतदारसंघाचे आमदार हणमंत निराणी यांच्याकडून खानापूर नगरपंचायत व तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीना कोरोना प्रतिबंधक औषध फवारणीसाठी ८०० लिटरचे सोडियम क्लोराइड नगरपंचायतीत नुकताच वाटप केले.
यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने याना खानापूर शहरासाठी १०० लिटर सोडियम क्लोराइडचे वाटप करण्यात आले.
तसेच तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीना ७०० लिटर सोडियम क्लोराइड देण्यात येणार आहे. यावेळी तालुका पंचायतीचे व्यवस्थापक देवराज याच्यांकडे स्वाधिन करण्यात आले.
वाटप समारंभाला नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने, नगराध्यक्ष मजहर खानापूरी, स्थायी समिती अध्यक्ष लक्ष्मण मादार, भाजप तालुका संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, जोतिबा रेमाणी, धनश्री सरदेसाई, वसंत देसाई, गुंडू तोपिनकट्टी, रवी बडगेर, राजेद्र रायका उपस्थित होते.
