नवयुवकांनी घेतला पुढाकार : यापुढेही एकत्र येण्यासाठी केले आवाहन
बेळगाव : निलजी तालुका बेळगांव येथे तरुण युवकांनी पुढाकार घेऊन वाढत्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी एकत्र येऊन गर्जुवंत गरीब कुटुंबीयांना घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
देशासह जगभरातील वाढत्या कोरोना महामारीमुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. आरोग्य क्षेत्र, लहान मोठे उद्योगक्षेत्र, शैक्षणिक, शेती, या सर्वांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गोरगरिबांना लॉकडाऊनमुळे उपासमारीची परिस्थिती उदभवली आहे. या सर्व गोष्टींची जाणीव ठेवून समाजातील अनेक दानशूर, समाजसेवक, मानवतावादी लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून गरजवंताना जिवनावश्यक वस्तू देऊन आपल्या जिवाला धोक्यात घालून माणूसकीचे दर्शन घडविले. अशाच गोष्टींची दखल घेऊन निलजी गावातील काही तरुणांनी युवक एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य करत आहेत. त्यामध्ये
आप्पाजी गाडेकर, नागराज पाटील, यलाप्पा पाटील, शरद पाटील, अमर गाडेकर, बसवंत पाडस्कर, नारायण पाटील, सुधीर लोहार यासह गावातील अनेक नागरिकांनी सहकार्य केले आहे. आदीनी फुल ना फुलाची पाकळी या धर्तीवर निलजी पंचक्रोशितील-परिसरातील जवळपास अत्यंत गरिब अशा शंभर पेक्षा जास्त कुटुंबाना निस्वार्थी भावनेने जिवनावश्यक वस्तूचे वाटप करून समाजासमोर एक आदर्श कार्य ऊभे केले. तसेच प्रसाद मेडिकलचे मालक
श्री. चांगो खाचू पाटील
अष्टविनायक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आरोग्याचा विचार करून समाजात विनामुल्य श्वासोच्छ्वास मशीन उपलब्ध करून दिले. ग्रामपंचायत सदस्यांनी संपूर्ण गाव सॅनिटायझर करुन दिले. अशीच सहकार्याची भावना मनी बाळगून एकमेकांना संकटसमयी मदत करा.
एक हात माणूसकीसाठी प्रतेकाणी लावा हा संदेश त्यांनी दिला आहे. सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य यापुढेही कायम करण्यासाठी निःस्वार्थ भावनेनं सेवा करावी. निलजी गावच्या सर्वांगिण विकासासाठी नव्या तरुण युवकांनी एकत्र येऊन यापुढेही एकदिलाने सहकार्य करण्याची भावना जोपासावी आणि पुढील कार्यासाठी निलजी गावाने एकमताने समाजसेवा आणि दान करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
निलजी गावामध्ये कोरोना महामारिमुळे बाहेर जाऊन पोट भरणे कठिण झाले असल्याने काही गावातील दानशूर, जबाबदार तसेच मानवता या गोष्टींची जाणीव ठेवून गरीब कुठुंबाना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या सर्व तरुणांचे आभारी आहे नारायण पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.