खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यात ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घेताना रेंज मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र खानापूर तालुक्यातील पारवाड ग्राम पंचायत हद्दीतील चोर्ला, पारवाड, व इतर गावात कोणतीच रेंज नाही. त्यामुळे काही गावातील विद्यार्थ्यांना रेंज मिळविण्यासाठी जंगलातुन गोवा हद्दीपर्यत तर काही गावातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र हद्दीपर्यत जाऊन ऑनलाईन शिक्षणाचे धडे घेताना नाकेनऊ येत आहे.
एकीकडे दाट जंगल, जंगली प्राण्याचे भय, अशातच उंच टेकडीवर जाऊन रेंज शोधुन ऑनलाईन शिक्षण घेत आहे.
सरकारने कोरोना काळात शिक्षणासह परीक्षा ही ऑनलाईन सुरू केल्यामुळे पदवीधर, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
तेव्हा पारवाड ग्राम पंचायत विभागात जिओ कंपनीचा टाॅवर उभारून विद्यार्थ्यांची समस्या सोडवावी अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालक विद्यार्थ्यातुन होत आहे
*प्रतिक्रीया
कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पारवाड ग्राम पंचायतीने जिओ टाॅवर मिळविण्यासाठी प्रयत्न करावे. भविष्यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यास सोयीचे होईल.
-दत्ता गावडे फोटोग्राफर
Check Also
खानापूर-लोंढा महामार्गावर अपघात : एक ठार, एक गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : खानापूर-लोंढा महामार्गावर जोमतळे गावानजीक, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वेगाने रस्त्या …