Monday , September 7 2026
Breaking News

कामगारांना मिळाले कामगार कार्ड : कार्डधारकांतून समाधान व्यक्त

Spread the love

नितीन जाधव यांच्या प्रयत्नाना यश

बेळगाव : शहापूर भागातील सामाजिक कार्यकर्ते नितीन जाधव यांनी विशेष प्रयत्न करून संबंधित विभागाकडून परिसरातील कामगार वर्गासाठी कामगार कार्ड काढून घेतली. त्या कामगार कार्डांचे वितरण आज प्रभाग क्रमांक 19 मधील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

नितीन जाधव यांच्या उपस्थितीत विनायक हावळाणाचे, मनोज केरवाडकर, युवराज हावळाणाचे, विनायक चौगुले, महेश कुंडेकर, सुशांत कुरंगे यांच्या हस्ते कामगार कार्डांचे वितरण करण्यात आले.

याआधी नितीन जाधव यांनी प्रभागातील ज्या कामगारांना कामगारकार्ड काढून दिली होती, त्या कामगार कार्डधारकांच्या बँक खात्यात कोरोना काळात टाळेबंदीमध्ये पंतप्रधानांच्या सूचनेवरून सहाय्य निधीतून तीन हजार रुपयांचा सहाय्य निधी जमा करण्यात आला होता.

आता राज्याचे कामगार मंत्री शिवराम हेब्बाळ यांनी कामगार कार्डधारकांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट पुरविले जाणार असल्याचे सांगितले आहे. याचा लाभही कामगार कार्डधारकांना होणार असल्याने नितीन जाधव यांच्या प्रयत्नातून कामगार कार्ड मिळालेल्या कार्डधारकांतून नितीन जाधव यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शाळेतील इंग्रजी विषयाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *