खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बिडी येथे येळ्ळूर येथील न्यू नवहिंद मल्टीपर्पज मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीच्या बिडी शाखेचा 16 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक विनोद पाटील, जवळी मेडिकलच्या सौ. प्रतिभा जवळी, न्यू नवहिंद मल्टीपर्पजचे खानापूर डिओ सी. डी. पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले.
बिडी शाखेचे मॅनेजर संजू कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व शाखेच्या प्रगतीचा आढावा मांडला. यावेळी कर्मचारी श्रुती निंगनगौडर, अभिजीत उपसकर, सुहास बिडीकर, शंकर कोलकर आदी सह बिडी परिसरातील अनेक लोक उपस्थित होते.
