Sunday , September 20 2026
Breaking News

हबनहट्टीत लोकसेवा फौंडेशनच्यावतीने वृक्षारोपण उत्साहात

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : हबनहट्टी (ता. खानापूर) व बेळगाव जिल्ह्याचे दक्षिण तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या हबनहट्टी येथे मलप्रभा नदीवर वसलेले, पंचक्रोशीतील काशी म्हणून प्रसिद्ध असलेले स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्रात लोकसेवा फौंडेशन बेळगावचे अध्यक्ष श्री. विरेश बसय्या हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र हबनहट्टीच्या परिसरात पिंपळ, वड, बेलपत्र, पेरू, आंबा अशा वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली.
यावेळी विरेश हिरेमठ यांच्याहस्ते रोप लागवड करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
बोलताना ते म्हणाले की, झाडे लावून निर्सग टिकवा, तरच आपल्याला ऑक्सिजन मिळेल. यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावून ते जगवा असे सांगून भाविकांनी अनवधानाने मंदिर परिसरात कचरा करू नये. यापुढे भाविकांनी मंदिर परिसरात स्वच्छता राखावी व लावलेल्या रोपांचे जतन व संवर्धन करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाला लोकसेवा फौंडेशनचे अध्यक्ष विरेश बसय्या हिरेमठ, मंदिराचे पुरोहित संजीव केस्तिकर, हणमंत नाईक, बाळू नाईक, मदन कुडतुरकर, पंढरी कुडतुरकर, राजू कुर्लेकर, दौलत कुर्लेकर, शामराव गावडे, श्री.मिथुन कुंभार, रोहित पाटील, बाळू कणबरकर, भावकाना आनंदाचे, रमेश पाटील इत्यादी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *