खानापूर (प्रतिनिधी) : लोंढा (ता. खानापूर) येथील गणपती मिठारे हे आपल्या शिवारातील घरात कामानिमित्त अडकले. मुसळधार पावसामुळे व पांढऱ्या नदीच्या वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे ते घराच्या छतावर राहिले. त्यांना गणेशगुडीच्या टीमने वाचविले.
याबाबत मिळालेला माहिती अशी की, तालुक्यातील मुसळधार पावसाने हाहाकार उडाला असताना लोंढ्यात ता. खानापूर येथील गणपत लक्ष्मण मिठारे हे शिवारातील घरात काल अडकले जवळुन पांढरी नदी वाहाते. पावसाचा जोर वाढला तसा पाण्याची पातळी वाढली. आणि गणपती मिठारेच्या घराला पाण्याने वेढले बघता बघता घरात पाणी शिरले. घरात कोंबड्या होत्या. मासे पाळले होते. त्यामुळे ते बाहेर पडले नाहीत जसजसे पाणी वाढले तसे घराच्या छप्परावर बसले. लोंढ्यात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावातून लोकांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र पांढरी नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला. लागलीच शोधकार्य सुरू झाले गणेशगुडी येथून विवेक वडेयर यांच्या टीमने बोटीच्या सहाय्याने त्यांना पाण्याच्या प्रवाहातुन बाहेर काढले.
ग्रा. पं. पिडीओ बलराज बजंत्री, पत्रकार यल्लापा कानेर, गावचे तलाटी, ग्राम पचायत सदस्य, गावचे नागरिक, त्यांचा भाऊ अनिल मिठारे यांच्या अथक प्रयत्नांमुळे गणपत मिठारे यांना जीवदान मिळाले. तर दुसरीकडे त्याचा शेतातील कोंबड्या, पाळलेले मासे, कुत्री आदीचे मोठे नुकसान झाले.
