खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात थैमान घातलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी करून सोडले. खानापूरात उचांकी पाऊस झाल्याने नदी, नाले, तलाव आदी तुडूंब भरून वाहत आहेत. पाण्याचा प्रवाह इतका वाढला की जळगे (ता. खानापूर) गावचा तलाव अक्षरशः फुटून भात शिवाराचे मोठे नुकसान झाले.
जळगे गावापासून जवळच सार्वजनिक तलाव आहे. शुक्रवारी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने या तलावात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे तलावाचा बांध फुटला व तलावाच्या खालच्या बाजूला असलेली भात जमिन वाहून गेली.
त्यामुळे जळगे गावच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांतून हळहळ होत आहे.
Check Also
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा युवा आघाडी मेळाव्याला जाहीर पाठिंबा
Spread the love खानापूर : युवा दिनी आयोजित युवा मेळाव्याला खानापूर तालुका म. ए. समितीने …