खानापूर (प्रतिनिधी) : ओलमणी ता. खानापूर जवळ श्रीराम सेनेकडून गोव्याला घेऊन जाणाऱ्या गाईंची सुटका करण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गाईंनी भरलेला तामिळनाडूतून गोव्याला जाणारा टीएन ५२ एफ ४४५० क्रमांकाचा ट्रक ओलमणी गावाजवळ श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते किरण साबळे, विनायक साबळे, परशराम पवार, परशराम चव्हाण, प्रकाश तोराळकर, प्रशात साबळे, मारूती चव्हाण आदीनी अडविला व लागलीच कार्यकर्त्यांनी याची माहिती श्रीराम सेना हिंदुस्थानचे तालुका अध्यक्ष पुंडलिक महाराज यांना दिली.
यावेळी अध्यक्षानी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली व ट्रक चालकाला जाब विचारला. यावेळी ट्रक चालकाने या गाई गोव्यामध्ये एका फाॅर्मला घेऊन जात आहे, असे सांगितले. लागलीच फाॅर्मच्या मालकाला फोन करून चौकशी केली व गाईंची सुटका केली.
यावेळी कुसमळीचे आनंद सावंत व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
तर बजरंग दलचे शहर प्रमुख अमोल परवी, ओतोळीचे कार्यकर्ते मारूती मुतगेकर, मर्यानी मुतगेकर, सागर गावडे, अनिल गावडे, पप्पू शेंगाळे, गोपाळ रामणीचे, लक्ष्मण शिंगाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
