खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड तालुका खानापूर येथील कार्यक्षेत्रातील अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा गुरव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रेश्मा तालीकोटी, महिला व बालविकास अधिकारी राममूर्ती के. व्ही., तालुका वलय अधिकारी सुनंदा यमकनमर्डी, तालुका आरोग्य अधिकारी संजीव नांद्रे, बिडी आरोग्य केंद्राचे डॉक्टर संजीव बावची, डॉक्टर विकास पै., बिडी वलय अधिकारी श्वेता हिट्टीन, ग्रामपंचायत विस्तीर्ण अधिकारी नागाप्पा बने उपस्थित होते. कोरोना काळात अंगणवाडी कार्यकर्त्यां शेवंता बाळेकुंद्री (बंकी बसरीकट्टी), वनिता गुरव (खैरवाड), वनिता पाटील, वंदना केसरकर (बेकवाड), पार्वती सुतार (हडलगा) तसेच आशा कार्यकर्त्या शांता पाटील, यल्लू झेंडे (बेकवाड), शांता मादार (खैरवाड), पार्वती काद्रोळकर (हडलगा), त्याचबरोबर बेकवाड पीएससी नर्स मंजुळा चिकोर्डे याने आपल्या जीवाची/पर्वा न करता समाजकार्यात सदैव कार्य करत आपली सेवा पार पाडली. त्याची पोचपावती म्हणून बेकवाड ग्रामपंचायत यांच्यावतीने त्यांना शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. या सत्कार समारंभ प्रसंगी बेकवाड ग्रामपंचायत सदस्य व महिला सदस्य कर्मचारी वर्ग ग्रामपंचायत व्यक्तीमधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कांबळे सर तर आभार प्रदर्शन श्वेता हिट्टीन यांनी केले.
