खानापूर (प्रतिनिधी) : पंचमसाली समाजाला २ ए वर्ग आरक्षण द्यावे. या मागणीसाठी सरकारकडे सतत मागणी होत असुन अद्याप सरकारने लक्ष दिले नाही. यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी बंगळूर येथे विद्यानसौधला घेराव घालून सरकारला जाब विचारण्यासाठी लिंगायत समाजाचे सर्वत्र मेळावे सुरू आहे.
तेव्हा गंदिगवाडात (ता. खानापूर) येथे येत्या २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला खानापूर तालुक्यातील लिंगायत समाजातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा पार पाडावा. असे आवाहन प्रथम जगद्गुरू श्री बसवजय मृत्यूंजय स्वामींजी यानी बुधवारी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी ते म्हणाले की, लिंगायत पंचम साली समाजाचा २ ए वर्गाचे आरक्षण लागू करावे. अशी लिंगायत सामाजाची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहेत.
तेव्हा सरकारला जागे करण्यासाठी येत्या १२ डिसेंबर बंगळूर येथे विद्यानसौध २५ लाख जनतेच्या उपस्थिती त घेराव घालून न्याय मागणार यासाठी सोमवारी दि. २८ रोजी दुपारी १ वाजता गंदिगवाड येथे होणाऱ्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थिती, लावावी असे आवाहन केले.
यावेळी गंदिगवाडचे अशोक यमकनमर्डी, अडवेश इटगी,
खानापूर नगरपंचायतीचे नगरसेवक आपय्या, महांतेश राऊत, ऍड. आर. एन. पाटील, उदयकुमार देसाई, अडवेश कुरमणवार, आर. एम. कुंनकनावर, संगमेश वाली, आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta