खानापूर (प्रतिनिधी) : के. के. कोप्प या गावी नवीन होणाऱ्या रेल्वे मार्ग विरोधात शेतकऱ्यांची बैठक नुकताच पार पडली. यावेळी शेतकरी वर्गाने, कोणत्याही परिस्थितीत आपली १ इंच जमीन रेल्वेसाठी देणार नाही, अशी भावना व्यक्त केली. स्वतःच्या स्वार्थासाठी गरीब शेतकऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न राजकीय व्यक्तीकडून होत आहे अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत आपल्या शेतात रेल्वे किंवा केडीबी अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर यांना य ठेवायला देणार नाही अशी भूमिका सर्व शेतकऱ्यांनी घेतली. सर्वे केलेले असताना अंतर कमी होत असताना पहिल्या मार्गानेच ट्रॅक करा असे सांगणे म्हणजे शेतकऱ्यांना देशोधडीला लावून अंगडी कुटुंबीय वयक्तिक स्वार्थ साधत असल्याचे उघड दिसून येते पण कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असा विश्वास शेतकरी नेत्यांनी दिला.
रिंगरोड मध्येही शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनी जात आहेत आणि दुसरीकडे रेल्वे असे करून शेतकऱ्याला देशोधडीला लावायचा सरकारचा प्रयत्न आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावं असे दुःख शेतकरी मांडत आहेत. यापुढे जर शेतकऱ्यांना त्रास झाला तर पहिला असो किंवा दुसरा असा कोणताही रेल्वेवे मार्ग होऊ देणार नाही, असे मत प्रसाद पाटील यांनी मांडले आणि सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
बैठकीला हुडप्पा नंदि अध्यक्षस्थानी होते, परशराम कोलकार, प्रसाद पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. आय पाटील, मनोज पावशे, आर. एम. चौगुले यांची भाषणे झाली. येत्या २८ तारीखला रिंगरोड आणि रेल्वे रोड विरोधात चाबूक मोर्चात मोठ्या संख्येने ट्रॅक्टर घेऊन उपस्थित रहा. कमीतकमी २५००० शेतकरी उपस्थित राहणार आहेत, असे शिवाजी सुंठकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी चंद्रकांत कोंडुस्कर, रामदास जाधव, मारुती लोकूर, परशराम जाधव, मारुती राऊत, डुंडूने आणि के. के. कोप्प गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta