निपाणी (वार्ता) : तालुका क्षेत्र शिक्षण अधिकारी कार्यालय व क्षेत्र संपनमुल कार्यालय यांच्या वतीने येथील केएलई इंग्लिश स्कूलमध्ये पहिली ते १० वी मधील विकल चेतन दिव्यांग विद्यार्थ्यांची मोफत मौल्यांकन शिबिर झाले. त्यामध्ये निपाणी तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेमधील सुमारे १५६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.
प्राथमिक व माध्यमिक शाळा मधील मतीमंद, अंपग, अस्थी रोग, बहिरेपणा, मूकबधिर व विविध आजाराने ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्यां साठीआरोग्य खाते व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
प्रारंभी दिव्यांग विद्यार्थी व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर अलिमकोचे वैद्यकीय पथक, हुबली येथील मनोविकास संस्थाचे अपंग वैद्यकीय पथक, मतिमंद, अस्थिव्यग, हाडांचे, डॉक्टर, नाक कान घसा तज्ञानी तपासणी करुन योग्य सल्ला दिला. यावेळी क्षेत्र समन्वय अधिकारी, जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी, सर्व डॉक्टर्स, अपंग मुलांचे पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta