खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक आज 1 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजता शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. शनिवार दि. 3 डिसेंबर रोजी सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई, चंद्रकांत दादा पाटील व खासदार धैर्यशील माने हे बेळगांव दौऱ्यावर येणार आहेत. त्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात येणार असून य बैठकीला तालुक्यातील समिती कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ सीमासत्याग्रही पुंडलिक चव्हाण, नारायण लाड,आणि शंकर पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta