Wednesday , March 4 2026
Breaking News

कोरोना काळातील बंद बसेस पूर्ववत सुरू करा

Spread the love

 

आम आदमी पक्षाचे केएसआरटीसीला निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका आम आदमी पक्षाच्यावतीने खानापूर केएसआरटीसी डेपो मॅनेजर महेश तिरकन्नावर यांना खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे अध्यक्ष भैरू पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोरोना काळात बंद असलेल्या बसेस पूर्ववत करा. व इतर समस्या सोडवा, असे निवेदन सोमवारी दि. ९ रोजी देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात खानापूर तालुक्यातील गावोगावी चालु असलेल्या बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये थोड्याच बससेवा चालू करण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांचे अपुऱ्या बससेवेमुळे हाल होत आहेत त्या पूर्ववत सुरू करा, खानापूर बस आगारमधील जादाहुन अधिक बसेस नादुरूस्त आहेत. तेव्हा नवीन बसेसची मागणी आदी मागणीचे निवेदन दिले.
निवेदन देताना खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील, सचिव शिवाजी गुंजीकर, दशरथ बनोशी, मनोहर सुळगेकर, गोविंद सांगलीकर, रूक्माणा चौगुले सह विद्यार्थी, पालक ममोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डेपो मॅनेजर महेश तिरप्पणावर यांनी निवेदनाचा स्विकार करून कोरोना काळात बंद असलेल्या बसेस सुरू करून बससेवा करू असे आश्वासन दिले.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *