खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तहसील कार्यालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी बाबतीत चर्चेत असते. सध्या गेल्या दीड महिन्यापासून खानापूर तहसील कार्यालयात तहसीलदार पद रिक्त होते. त्यामुळे नुकताच खानापूर तहसीलदार म्हणून बेळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयातील डीव्हीडीसी अधिकारी व्ही. एम. गोठेकर यांची नियुक्ती करण्यात आली. नुतन तहसीलदार व्ही. एम. गोठेकर यांनी रविवारी दि. २२ रोजी खानापूर तहसील कार्यालयात रविवारी सुट्टीच्या दिवशी येऊन पदभार स्विकारला.
यावेळी उपतहसीलदार के. एम. कोलकार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
खानापूर तहसील कार्यालयातील उपतहसीलदार के. एम. कोलकार, ग्रेड डू तहसीलदार व्ही. आर. मॅगेरी, व्ही. एस. हिरेमठ, सुनिल देसाई, मंजुनाथ आदी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी नुतन तहसीलदार व्ही. एम. गोठेकर यांनी आपला परीचय करून उपस्थिताची ओळख करून घेतली.
Belgaum Varta Belgaum Varta