खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर मतदारसंघाचे जेडीेएसचे उमेदवार नासीर बागवानचा ६६ वा वाढदिवसानिमित्त येत्या २ फेब्रुवारी रोजी येथील मलप्रभा क्रीडांगणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जेडीेएसचे उमेदवार नासीर बागवान यांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
प्रारंभी खानापूर तालुका जेडीएसचे अध्यक्ष एम. एम. सावकार यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना जेडीएसचे उमेदवार नासीर बागवान म्हणाले की, येत्या २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माझ्या वाढदिवसाला तालुक्यातील वारकरी, विविध क्षेत्रातील जनता, विविध मठाचे स्वामी व जेडीएसचे वरिष्ठ नेते मंडळींच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.
प्रारंभी सकाळी १० वाजता शिवस्मारकातील शिवाजी महाराजांना अभिवादन करून, तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, बसवेश्वर पुतळ्याला मालार्पण करून त्याचबरोबर चौराशी देवीचे दर्शन घेऊन रॅलीतुन मलप्रभा क्रीडांगण जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी आशीर्वाचन करण्यासाठी खानापूरसह बेळगावच्या विविध भागातुन अनेक मठाधिश उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, जेडीएसचे राजाध्यक्ष सी. एम. इब्राहिम, माजी उपसभापती सचिदानंद खोत, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, राज्य प्रधान कार्यदर्शी फैजुल्ला माडीवाले, जिल्हा अध्यक्ष शंकर माडलगी, खानापूरचे माजी जिल्हा पंचायत सदस्य विशाल पाटील, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कार्यक्रमाचे औचित्य साधुन सभा व वाढदिवसाचा कार्यक्रम दुपारी वारकरीसाठी किर्तन, त्यानंतर सायंकाळी महाराष्ट्रातील मराठमोळा लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती दिली.
पत्रकार परिषदेला जेडीएसच्या नेत्या व नगरसेविका मेघा कुंदरगी, माजी जिल्हा पंचायत सदस्य विशाल पाटील, जेडीएसचे तालुका अध्यक्ष एम. एम. सावकार आदी उपस्थित होते.
शेवटी एम. एम. सावकार यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta