खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील गाळेधारकांवर अन्याय सुरूच आहे.
जत -जांबोटी महामार्गावरील खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवर गाळेधारकांनी मोठ्या कष्टाने वर्गणी काढून लोकप्रितिनीधींच्या सहकार्याने गाळे उभारण्यासाठी सुरूवात केली. परंतु गाळे पूर्ण उभारण्याआधीच संबंधित पीडब्ल्यूडी खात्याच्या अधिकार्यांनी चक्क गाळे काढण्यासाठी जीसीबी लावली. मात्र लोकप्रतिनिधी अधिकार्यांना समज देऊन गाळे काढण्यासाठी रोखले नाही. त्यामुळे गाळेधारकांनी उभारलेल्या गाळ्यांच्या साहित्याचे मोडतोड झाले. त्यातही गरीब गाळेधारकांना आर्थिक त्रास सहन करावा लागला.
गेल्या वर्षभरापासून जांबोटी क्रॉसवर गाळेधारक व संबंधित पीडब्लूडी खात्याचे अधिकारी यांच्यात संघर्ष सुरू आहे. मात्र हा संघर्ष सोडविण्यास म्हणावा तसा लोकप्रतिनिधी, नेते मंडळीचा प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे खानापूर तालुक्यातील पीडब्ल्यूडी खात्याचे अधिकारी सरसावले व गरीब गाळेधारकांना आपले पोट भरून घेण्यास परावृत्त केले.
आज गेल्या वर्षभरापासून गाळेधारक बीन काम दिवस काढत आहेत. त्यांच्या पोटापाण्याचा कोणीच विचार करत नाहीत असा प्रश्न गाळेधारकांना पडला आहे.
सुरूवातीला तयार गाळ्यावर जेसीबी लावली त्यावेळी भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील यांनी पीडल्यूडी खात्याच्या अधिकार्यांसी चर्चा करून वेळ मागुन घेऊन गाळे काढण्यापासून थांबविले. मात्र पुन्हा काही दिवसांनी पुन्हा संबंधित अधिकार्यांनी पुन्हा गाळे पूर्ण काढून टाकले आता गाळेधारकांपुढे सर्व आंधार आहे.
आता कोण लोकप्रतिनिधी, नेते मंडळी पुढे येऊन गाळेधारकांना न्याय देणार हे पाहवे लागणार आहे.
Check Also
म. मं. ताराराणी पदवीपूर्व कॉलेजची कुमारी साधना होसुरकर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात…
Spread the love खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेचे ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर या विद्यालयातील …