
खानापूर : केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात “विजय संकल्प अभियान” सुरू केले आहे. भाजपाने केलेल्या कामाना चालना देण्यासाठी भाजपाने हे विशेष अभियान हाती घेतले आहे.
भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत या विजय संकल्प अभियान राबविण्यासाठी खानापूर तालुक्यातील प्रत्येक गावात संपर्क साधत आहेत. तालुक्यातील चिक्कमुनवळ्ळी येथे घरोघरी भारतीय जनता पक्षाचे झेंडे, भिंतीपत्रक व पत्रकांचे वाटप करण्यात आले. भाजपा सरकारने शिक्षण, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा सांस्कृतिक क्षेत्र, गरीब व निराधारांसाठी आरक्षण, सामाजिक सबलीकरण, रोजगार, भाषिक विकास, लसीकरण, मुलींचे शिक्षण, दीनदयाळ ग्रामज्योती अभियान, रशिया युक्रेन युद्धच्या वेळी ऑपरेशन गंगा, अशी कामे केली आहेत. मैत्रीपूर्ण योजना, भारातमाला, सागरमाला योजना, वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे, वंदे भारत मिशन कोविड पीएम केअर काशी सोमनाथ, उजैन सोमनाथ, अयोध्याचे नूतनीकरण यासारखे प्रमुख प्रकल्प केंद्र सरकारने यशस्वीरित्या राबविले आहेत.
डॉ. सोनाली सरनोबत यांनी विजय संकल्प अभियानासाठी खानापूर तालुक्यातील जवळपास सर्व गावांना भेटी दिल्या आहेत.
यावेळी डॉ.सरनोबत यांच्यासमवेत भाजपा नेते आनंद पाटील, शिवाजी सनदी, शिवशंकर पूजार, संजीव कारकी, अनिता कोमस्कर, गंगूताई तलवार, काव्या आंदोळकर, ज्योती हंगमुली, तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta