
उमेदवारीसाठी अर्जाचे आवाहन
बेळगाव : महाराष्ट्र एकिकरण समिती खानापूर तालुकातर्फे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकाकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहे. १० फेब्रुवारी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत अर्जासाठी आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या निकालाच्या अंतिम क्षणी सर्वजण म. ए. समितीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र राहून येणारी विधानसभा निवडणूक जिंकणे ही काळाची गरज आहे. आपापसातील सर्व मतभेद व मनभेद गाडुन 66 वर्षांची सीमाप्रश्नाची चळवळ वाया जावू नये म्हणून प्रत्येक मराठी भाषिकांने सर्व गैरसमज दूर करून म. ए. समितीचा “भगवा झेंडा” पून्हा विजयी करणे, आणि वाड-वडीलांचे महाराष्ट्रात जाण्याचे स्वप्न पूर्ण करणे. हेच आम्हां सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.
खानापूर तालूका म. ए. समिती आता एकसंघ आहे. या सीमाप्रश्नाच्या अंतिम क्षणी, बेकी करणाऱ्या कुठल्याही “सुर्याजी पिसाळा”ला जनतेने जवळ न करता समिती कार्यामध्ये सामील व्हावे. भाजप, काँग्रेस व जे. डी. एस. सारखे राष्ट्रीय पक्ष आपल्या मराठी भाषिक जनतेला वेग-वेगळी आमिषे देणे व पैशाची खैरात करुन स्वाभिमानी मराठी माणसांची मते विकत घेण्याचा लाजिरवाणा प्रयत्न करीत आहेत. पण हुतात्म्यांचे बलिदान,” “मराठी माणसांच्या पाठीवर उठलेले लाट्याकाठ्यांचे वळ” व” कर्नाटक सरकारचा अत्याचार, प्रत्येक मराठी माणुस कदापी विसरणार नाही.
म. ए. समिती ही सर्व सामान्य जनतेच्या निढळ अस्मितेवर आधारीत आहे आणि येणारी विधानसभा निवडणूक लढवू इच्छीणाऱ्यांनी आपला उमेदवारी अर्ज स्व-हस्ताक्षरांत लिहून म. ए. समितीला 51 हजार देणगीसह १० फेब्रुवारी 2023 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत शिवस्मारक खानापूर येथे आणून द्यावे, अनामत रक्कम (डिपॉजीट) नंतर कळविण्यात येईल, असे माजी आमदार दिगंबर पाटील, खानापूर म. ए. समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, सचिव एस. एन. बेडरे, कार्याध्यक्ष यशवंत बिरजे आदीसह उपाध्यक्ष, विविध विभाग प्रमुख आणि आजी आणि माजी सदस्यांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta