खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नारायण मयेकर होते.
बैठकीला स्थायी कमिटीचे चेअरमन प्रकाश बैलूरकर, चीफ ऑफिसर आर. के. वटार होते.
प्रास्ताविक प्रेमानंद नाईक यांनी केले.
यावेळी बैठकीत खानापूरशहराच्या एस सी एस टी स्मशानभूमीत विद्युत खांबाची सोय करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच खानापूर शहरासाठी अमृतजल योजनेसाठी २० कोटी ५२ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावर चर्चा झाली. समर्थ काॅलनीत गटारी, रस्ते करा, अशी मागणी बैठकीच्या वेळी ग्रामस्थानी केली.
नगराध्यक्ष नारायण मयेकर यांनी चीफ ऑफिसर, इंजिनिअर व मी स्वतः समर्थ नगराला भेट देऊन पाहणी करतो, असे सागितले.
तसेच बैठकीत खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिकांना कार्यालय उभारण्यासाठी जागा द्या, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली. तसेच दुर्गा नगरात साईबाबा मंदिर उभारण्यात येणाऱ्या जागेला परवानगी द्यावी.
नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसरना चार चाकी वाहनाची सोय व्हावी. तसेच स्वच्छता कामगारांना वेळेत पगार व्हावा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीला नगरसेवक तोहीद चांदखणावर, लक्ष्मण मादार, आप्पया कोडोळी, विनायक कलाल, नारायण ओगले, हणमंत पुजार, विनोद पाटील, मजहर खानापूरी, महमद रफिक वारेमणी, नगरसेविका मिनाक्षी बैलूरकर, लता पाटील, शोभा गावडे, जया भुतकी, राजश्री तोपिनकट्टी, फातिमा बेपारी, सहारा सनदी आदींसह नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta