खानापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते. त्यानुसार महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते आबासाहेब दळवी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज समितीकडे शक्तिप्रदर्शनाने सुपूर्द केला.
म. ए. समिती इच्छुक उमेदवारांकडून 51 हजार रुपये अनामत रक्कम भरून अर्ज मागविण्याची प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार आबासाहेब दळवी यांनी म. ए. समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे तसेच सचिव विलास बेडरे यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला.
यावेळी समितीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दिगंबर पाटील, बाळासाहेब शेलार, प्रकाश चव्हाण, निरंजन सरदेसाई, ज्येष्ठ सीमासत्याग्रही शंकरराव नागेशराव पाटील, नंदगड विभागप्रमुख अर्जुन देसाई, लोंढा विभागप्रमुख कृष्णा मनोळकर, विलास बेळगावकर, मारुती परमेकर, प्रल्हाद मादार, रुक्माना झुंजवाडकर, परशराम देवलतकर, सुधीर पाटील, आबाजी पाटील, वासुदेव पाटील, एन. के. पाटील, प्रकाश पाटील, रणजित पाटील कारलगा, रवी सुतार कारलगा, मारुती दळवी, जगन्नाथ देसाई कापोली, मुरारी देसाई कापोली, वसंत गुंडपीकर, गजानन गुरव, जयसिंग पाटील, बी. एन. पाटील उपस्थित होते.
यावेळी मणतुर्गा ग्रामस्थ, पंच कमिटी तसेच तालुक्यातील समिती कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करत आबासाहेब दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.