
खानापूर : डॉ. सोनली सरनोबत यांच्या हस्ते कणकुंबी येथील माऊली देवस्थानातील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या गणपती मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
तब्बल बारा वर्षानंतर माऊली यात्रा भरविण्यात अली आहे. दर बारा वर्षांनी माऊली भगिनींच्या भेटीचा सोहळा पार पडतो. मालप्रभा आणि म्हादाई नदीचे उगमस्थान रामेश्वर मंदिराजवळ आहे.

डॉ. सोनाली सरनोबत यांनी प्रथम माऊली देवीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली व देवीचे आशीर्वाद घेतले त्यानंतर डॉ. सरनोबत यांच्या हस्ते गणपती मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माऊली मंदिराचे विश्वस्त श्री. रघुनाथ दळवी यांच्यासह मंदिर ट्रस्टचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. सोनाली सरनोबत यांनी माऊली मंदिर ट्रस्टला एक लाख रुपयांची भरीव देणगी देऊ केली आहे.
यावेळी भाजपा नेते आनंद पाटील, अर्जुन गावडा, अनिता कोमास्कर, काव्या औन्धकर, गंगा तलवार, सचिन पवार, अनंत गावडा, बाळेश चव्हाणवर, भीमसेन आगसर, संजीव काक्री, अनुसया आगस्कर, गणपती गावडे आदी उपस्थित होते. त्यानंतर डॉ. सोनाली सरनोबत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी
चिगुळे येथे यात्रेनिमित्त भेट दिली व म्हातारबाई मंदिरात देवीचे दर्शन घेतले व उपस्थित श्रोत्यांना संबोधित केले.
यावेळी डॉ. सोनाली सरनोबत व ऍड. राजू बागेवाडी यांनी संपर्क रस्ता व मोबाईल टॉवर यासारख्या प्रश्नावर ग्रामस्थांशी चर्चा केली.
Belgaum Varta Belgaum Varta