
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील होनकल व आसोगा आदी ठिकाणी ऐन उन्हाळ्यात आग लागुन काजू बागेचे व ऊसाचे प्रचंड नुकसान झाल्याची घटना नुकताच घडली.
होनकल (ता. खानापूर) गावापासुन जवळ असलेल्या सर्वे नंबर २३ मधील तीन ते चार एकर जमिनीतील काजु बागेला दुपारच्या भर उन्हात आग लागून काजू बागेचे प्रचंड नुकसान झाले.
यामध्ये शेतकरी सातेरी रामचंद्र घाडी यांच्या दोन एकर जमिनीतील काजू बाग, निवृत्ती हणमंत घाडी यांच्या अर्धा एकर जमिनीतील काजू बाग, मारूती गिर्याणा घाडी यांच्या जमिनीतील अर्धा एकर काजु बाग जळुन खाक झाली आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्ताना आर्थिक नुकसान द्यावी, अशी मागणी होनकल गावच्या नागरिकांतून होत आहे.
असोगा (ता. खानापूर) येथील मित्रमळा शेती जवळ असलेल्या शेतातील ऊस पिकाला शार्टसर्किटमुळे आग लागून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
ऊस शेतातून गेलेल्या विद्युत खांब्यावरील तारांच्या घर्षणामुळे शेतकरी प्रविण सुळकर, नागो सुळकर, राजाराम सुळकर, जयवंत सुळकर, शामराव पाटील, वान सुळकर, मधुकर सुळकर, आदी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
याही शेतकऱ्यांना संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी, भेट देऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी असोगा शेतकरी वर्गातून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta