
खानापूर : देवलत्ती (ता. खानापूर) येथील वीज समस्या निकाली लावण्यात भाजप ग्रामीण महिला उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी यश मिळवले. यानिमित्त देवलत्तीवासीयांनी त्यांचा नागरी सत्कार केला. डॉ. सरनोबत त्यांनी गावातील समस्या सोडवण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल ग्रामस्थांनी प्रशंसा केली.
डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या, गावातील कोणत्याही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मुख्यमंत्र्यांपर्यंत समस्या मांडून त्यावर उपाययोजना केल्या जातील.
शंभूलिंग शिवाचार्य स्वामी, चन्नबसव स्वामी, ग्रा. पं. अध्यक्षा संजिवनी बडिगेर, निर्मला टक्केकर, मोहन कुलकर्णी, बसनगौडा पाटील, ए. आर. एन. पाटील, काळप्पा अगशीमनी, मल्लनगौडा पाटील, बसवराज कडेमनी, हणुमंत ठक्कर, विठ्ठल निडगलकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta