खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शिवस्मारक चौक ते महाजन खूट पर्यंतच्या रस्त्यावर बाजारपेठेत दिवसेदिवस भयानक गर्दी उसळत आहे. अशा बाजारात चारचाकी, अवजड वाहनांना सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत पूर्ण बंदी घालण्यात यावी, अशी जोरदार चर्चा करण्यात आली.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नारायणराव मयेकर होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, स्थायी कमिटी चेअरमन विनोद पाटील, चीफ ऑफिसर आर के वटार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष नारायण मयेकर म्हणाले की, खानापूर शहरातील बाजारात वाहतुकीची कोंडी गेल्या कित्येक वर्षांपासून आहे.
तेव्हा बाजारात चार चाकी व आवड वाहनांना सकाळी १० पासुन सायंकाळी ७ पर्यंत बंदी घालावी. त्यामुळे रहदारीची कोंडी होणार नाही.
व्यापारी वर्गातून जेष्ठ नागरिक प्रकाश चव्हाण यांनी बाजारात दुकानसाठी साहित्य पोचविणारे चार चाकी वाहन, अवजड वाहने केव्हा ही येतात. त्याना वेळेचे बंद न घालता येणार नाही. लांब पल्ल्याचे साहित्य रात्री घेऊन येणे शक्य नाही.
यासाठी पर्यायी मार्ग नगरपंचायतीने ठरवावा. तसेच दुकानदारांनी अतिक्रमण करून फुटपाथवर दुकानाचे साहित्य ठेवले जाते. भाजीविक्रेते रस्त्यावर बसतात. यावर मार्ग काढा असे सूचित केले.
यावेळी व्यापारी बाळू सावंत, श्री. सुळकर, श्री. उप्पीन प्रकाश देशपांडे आदींनी सुचना केल्या. त्यानंतर नगराध्यक्ष नारायण मयेकर यांनी नगरसेवकांच्या बैठकीत चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ असे यावेळी पोलिस खात्याचे जयराम व ए एस आय अधिकारी उपस्थित होते. याशिवाय इतर विषयावरही नगरसेवकानी चर्चा केली. बैठकीला नगरसेवक माजी स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर, नगरसेवक आप्पया कोडोळी, विनायक कलाल, तोहिद चांदखन्नावर, मजहर खानापूरी, महमद रफिक, नगरसेविका राजश्री तोपिनकट्टी, शोभा गावडे, सहारा सनदी, लता पाटील, फातिमा बेपारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यावेळी बैठीत इतर समस्यांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत नगरसेवक, अधिकारी, अभियंते कर्मचारी आदी उपस्थित होते.
आभार प्रेमानंद नाईक यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta