खानापूर (प्रतिनिधी) : असोगा (ता. खानापूर) येथील सुप्रसिद्ध श्री रामलिंग देवस्थानावर 2014 साली जिल्हाधिकारी, बेळगांव यांनी प्रशासक नेमला. नवीन देवस्थान कायद्यानुसार फक्त 6 महिन्याच्या कालावधीसाठी अथवा जास्तीत जास्त एक वर्षासाठी प्रशासक नेमता येतो व त्यानंतर जिल्हा धार्मिक परिषद नियमानुसार वृत्तपत्रात जाहीर नोटीस देऊन नवीन कमिटी नेमण्यासाठी हिंदु धर्मीय जनतेकडून अर्ज मागविण्यात येतो व अर्जांची सखोल तपासणी करून, नंतर मुलाखत घेऊन नवीन विश्वास्थांची नेमणूक करते. परंतु, नवीन कायद्यातील तरतुदीनुसार बेळगांव जिल्ह्यासाठी जिल्हा धार्मिक परिषदेचीच रचना 2020 सालापर्यंत न झाल्याने प्रशासक हटविण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली. कर्नाटकात मागील वर्षी भाजपाचे सरकार आल्यानंतर बेळगांव जिल्ह्यासाठी जिल्हा धार्मीक परिषदेची रचना झाली. त्यामुळे प्रशासक असलेल्या बेळगांव जिल्ह्यातील 6 ते 7 देवस्थानांवरील प्रशासक हटविण्यासाठीचा अडथळा आता दुर झाला आहे. या संदर्भात भाजपाचे वरिष्ठ नेते व महालक्ष्मी सहकारी संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगांव जिल्हाधिकारी एम. जी हिरेमठ यांना प्रशासक हटविण्यासंदर्भात लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी लवकरात लवकर प्रशासक हटवून सदर देवस्थानावर नवीन विश्वस्थ कमिटी नेमण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी दिले. यावेळी खानापूर येथील सुप्रसिद्ध अधिवक्ता व भा. ज. पा. जिल्हा पदाधिकारी अॅड. चेतन अरुण मणेरीकर, युवा भाजपा नेते पंडीत प्रकाश ओगले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना यांच्यावतीने रविवारी आरोग्य तपासणी शिबीर
Spread the love खानापूर : खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना खानापूर यांच्या सौजन्याने …