
खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोपात (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही शनिवारी दि. १८ रोजी पांडुरंग सप्ताहाला प्रारंभ झाला.
शनिवारी सकाळी भक्ती ध्वजारोहण होऊन उत्सवाची सुरूवात झाली. यावेळी वारकरी मंडळी सिंगीनकोप याच्या अधिष्ठाणाखाली पुजन होऊन ज्ञानेश्वरी ९ व्या व १२ व्या अध्यायाचे सामुदायिक वाचन झाले. दुपारी सांप्रदायिक भजन होऊन सायंकाळी विविध गावच्या भजनी मंडळाचे सांप्रदायिक भजन उत्साहात पार पडले. रात्री भारुडाचा कार्यक्रम पार पडला.
रविवारी दि. १९ रोजी पहाटे ५.३० काकड आरती होऊन सकाळी ८ वाजता गावातुन श्री च्या पालखीचा दिली सोहळा होणार आहे.
त्यानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
तरी पांडुरंग सप्ताहाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सिंगीनकोप श्री स्वामी विवेकानंद मंडळ, वारकरी मंडळ, ग्रामस्थ व पंच कमिटी याच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta