खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नूतन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवार दिनांक 22 रोजी दुपारी 3 वा. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे. या उद्घाटन प्रसंगी मध्यवर्ती म. ए. समिती तसेच बेळगाव व येळ्ळूर भागातील समिती नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी खानापूर तालुक्यातील म. ए. समितीच्या सर्व उपाध्यक्षासह सर्व नूतन कार्यकारिणी सदस्य, आजी माजी लोकप्रतिनिधी, सीमासत्याग्रही व समिती कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन खानापूर म. ए. समिती अध्यक्ष गोपाळराव बळवंतराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे व सेक्रेटरी सिताराम बेडरे यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta