खानापूर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीच्या तीन खोल्या जमिनदोस्त झाल्या. याची पाहणी केंद्रीय पथकासह जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली.
यावेळी केंद्रीय जल आयोग, जल उर्जा मंत्रालयाचे संचालक अशोक कुमार व्ही, यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अभ्यास पथकात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही व्ही शास्त्री तसेच कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. जी. एस. श्री. निवास रेड्डी, सीईओ दर्शन, तहसीलदार प्रविण जैन, बीईओ राजेश्री कुडची, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी राजेश धनवडकर, आदीनी करून वर्ष होत आले. तरीसुद्धा नुतन इमारत उभारण्याकडे शासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाची जागे अभावी खूपच कुचंबणा होत आहे.
सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीच्या तीन खोल्यांची झालेल्या नुकसानाची माहिती अधिकाऱ्यांनी करून घेतली.
जूलै महिन्यात मुसळधार पावसामुळे शाळेच्या तीन खोल्या कोसळल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना गावच्या समुदाय भवनात बसविण्याची सोय करण्यात आली. यावेळी बीईओ राजश्री कुडची यांनी शाळेच्या समस्या सांगितल्या. शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष विश्वनाथ पाटील व सदस्य तसेच गावचे पंच कमिटी, पालक आदीनी शाळेच्या समस्या मांडल्या. परंतु वर्ष संपत आले तरीसुद्धा इमारती संदर्भात कोणतीच हालचाल नाही.
येत्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नविन शैक्षणिक वर्षाला सुरूवात होणार, त्यातच पावसाला सुरूवात होणार अशा वेळी पहिला ते पाचवी पर्यंतच्या जवळपास ५० विद्यार्थ्यांची बसण्याची सोय कुठे करावी, असा प्रश्न शाळा मुख्याध्यापक, शिक्षक वर्गाला तसेच शाळा सुधारणा कमिटीला पडला आहे.
तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी, तालुका प्रतिनिधीनी याकडे लक्ष देऊन नविन इमारत उभारण्यासाठी प्रयत्न करावे, विद्यार्थ्यांची अडचण दूर करावी, अशी मागणी सर्व थरातुन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta