खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल ओलमनी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून शाळा सुधारणा मंडळाचे चेअरमन श्री. तुकाराम हनुमंतराव साबळे उपस्थित होते, त्याचबरोबर शाळा सुधारणा मंडळाचे सदस्य कालमनी गावचे श्रीपाद भरणकर, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत साबळे, मारुती साबळे, प्रभाकर साबळे, हनुमंत जगताप, नारायण गुंडू सुतार व प्रमुख वक्ते म्हणून श्रीमान एम. पी. गिरी सर होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व महात्मा फुले फोटो पूजन झाले. विद्यार्थिनींच्या स्वागतगीता नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविकेतून मुख्याध्यापक सी. एस. कदम सर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर विविध पातळीवर शालेय क्रीडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रमुख वक्ते एम. पी. गिरी सरांनी विद्यार्थ्यांना भविष्यात वेध घेण्याचे मूलमंत्र सांगितले. आयुष्यात आपण कितीही मोठे झालो तरी संस्कार संस्कृती हे विसरून चालणार नाही. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभाई पटेल, लोकमान्य टिळक, आंबेडकर यांची उदाहरणे देऊन आयुष्यात कितीही मोठी संकटे आली तरी संघर्ष करत आपण आपले यश गाठले पाहिजेत असा सुंदर संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना देऊन दहावीच्या परीक्षेत यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. मागील वर्षी उत्तुंग कामगिरी केलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव ही यावेळी करण्यात आला. याप्रसंगी आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची भाषणे झाली शिक्षकांच्या वतीने श्री. एस आय काकतकर सरांनी आपले विचार मांडले तर सूत्रसंचालन श्री. अजित सावंत सरांनी व आभार श्री. एन व्ही पाटील सरांनी मांडले.
Belgaum Varta Belgaum Varta