खानापूर : खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक धर्मनाथ भवन बेळगांव येथे दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
खानापूर भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्यामुळे उमेदवार निवडीचे आव्हान पक्षासमोर उभे ठाकले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांची मते अजमावण्याचे ठरविले आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्षाच्या महाशक्ती प्रमुख, बूथ प्रमुखसह मुख्य पदाधिकाऱ्यांची मते अजमावली जाणार आहेत. खानापूर तालुक्यात 255 बूथ आहेत त्या बुथ मधून उपस्थित असलेल्या शक्ती प्रमुख, महाशक्ती प्रमुख व बूथ पदाधिकाऱ्यांचे गुप्त मतदान घेण्यात येणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. या मतदान प्रक्रियेसाठी तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे धर्मनाथभवन येथे होणाऱ्या बैठकीकडे तालुक्यातील अनेकांचे लक्ष वेधले आहे.
भाजपामधून विधानसभेसाठी एकूण सहा जण इच्छुक आहेत प्रत्येकाने आपापल्यापरीने मोर्चेबांधणी केलेली आहे. सर्वच इच्छुक आपापल्या परीने जनसंपर्क करीत आहेत पक्षाने देखील गुप्तपणे तालुक्यात सर्वे केलेला आहे. निवड प्रक्रियेसाठी गुप्त मतदान घेण्याचा घाट पक्षाने जरी घातला असला तरी ही प्रक्रिया एक औपचारिकता आहे. उमेदवार निवडीचा अधिकार हा पक्षश्रेष्ठींकडेच असणार आहे त्यामुळे गुप्त मतदानाचा हा घाट घालण्यामागे पक्षाचा नेमका हेतू काय? असा सवाल सामान्य नागरिकांना पडला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta