खानापूर (प्रतिनिधी) : कान्सुली (ता. खानापूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, व जनावराचा दवाखाना उभा करावा. अशा मागणीचे निवेदन जिल्हा पंचायत सदस्य नारायण कार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली नागुर्डा ग्राम पंचायत अध्यक्ष बाळू बिर्जे यांच्या अध्यक्षतेखाली एमएलसी महांतेश कवटगीमठ यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, नागुर्डा ग्राम पंचायत हद्दीतील कान्सुली व परिसरातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जनावरासाठी जनावराच्या दवाखान्याची नितांत गरज आहे. तेव्हा लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्र व जनावरांचा दवाखाना उभारावा अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी उपाध्यक्षा सौ. वैशाली सुळेभाविकर, सदस्य वासु ओलमनकर, सौ. पुजा चाळगुंडे, लक्ष्मण पारवाडकर, लक्ष्मण गावडे, संतोष परीट, मनोहर बरूकर, संजय कांबळे, वैशाली बुरूड, तसेच कान्सुलीचे नागरिक रामू कालमणकर, लक्ष्मी चाळगुंडे, टोपाणा कालमनकर, विष्णू गावडे, पुंडलिक गावडे, सोमाना नवलूचे, अमृत शिरपूरकर, सुरेश किणेकर, मारूती किनेकर, पीडीओ प्रविण आदी उपस्थित होते.
यावेळी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी आदी हजर होते.
एमएलसी महांतेश कवटगीमठ यांनी निवेदनाचा स्विकार करून समस्या सोडवू असे आश्वासन दिले.
