रमेश कत्ती : सोसायटी बाजाराचे उद्घाटन
निपाणी : सहकारी तत्त्वावर सभासदांना बरोबरच गावांचाही विकास साधत येतो. फक्त या ठिकाणी राजकारणविरहित काम केले पाहिजे. हे दाखवून दिले आहे, जत्राट गावच्या प्राथमिक कृषी सहकारी संघाचे चेअरमन रमेश भिवशे यांनी सहकारी संस्था राजकारणविरहित काम केल्यानेच आज त्यांच्या संघामार्फत जत्राट सोसायटी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी खासदार रमेश कत्ती बोलत होते. प्रारंभी व्यासपिठावर मान्यवरांच्या हस्ते सोसायटी बाजारचे उद्घाटन झाले.
रमेश कत्ती म्हणाले, या संघाच्या प्रगतीसाठी आपण नेहमीच पाठीशी आहे. सोसायटीच्या गोडाऊन बांधकामसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून 1 टक्के व्याज दरात 75 लाख रुपये आपण देणार आहे त्यामुळे त्या पुढील काळातील ही शेतकर्यांसाठी त्या संस्थेच्या पदाधिकार्यांनी झटावे.
युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, सहकारी तत्त्वावर आज ग्रामीण भागाचे अर्थकारण चालू आहे.
ग्रामीण भागातील अर्थकारणाला जोड देण्यासाठी सहकार क्षेत्र हे एक प्रमुख माध्यम बनले आहे. जत्राटसारख्या ग्रामीण भागात अध्यक्ष रमेश भिवशे यांनी सोसायटी बाजाराचे प्रारंभ करून जत्राटसह परिसरातील नागरिकांना शुद्ध व निवडक गृहपयोगी साहित्य मिळावे यासाठी प्रयत्न केले आहेत. यामागे संघाचे निस्वार्थ संचालक मंडळ व प्रामाणिक कर्मचारी बरोबरच सभासदांची मोलाचे सहकार्य असल्याचे सांगितले.
यावेळी माजी खासदार प्रकाश हुक्केरी, माजी आमदार काकासाहेब पाटील, बोरगावचे युवा नेते उत्तम पाटील, माजी आमदार वीरकुमार पाटील, माजी आमदार सुभाष जोशी, संघाचे अध्यक्ष रमेश भिवसे, ग्रामपंचायत अध्यक्ष रोहन भिवशे, हिरा शुगर कारखान्याचे संचालक प्रल्हाद पाटील, सुरेश बेल्लद, निरंजन पाटील, अरुण निकाडे, अदगोंडा पाटील, पिरगौडा पाटील, राजू पाटील अकोळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
बेडकिहाळ दसरा महोत्सवात श्रीनय बाडकरची हॅट्ट्रिक
Spread the love निपाणी : बेडकिहाळ दसरा महोत्सवामध्ये स्वर्गीय श्री. अशोक टी. नारे एजुकेशन अँड …