खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मोहिशेत ग्राम पंचायत हद्दीतील मिराशी वाटरे गावाच्या हद्दीत सरकारच्या कचरा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध आहे.
यासंदर्भात मिराशी वाटरे गावाच्या ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी प्रकाश हल्लणावर यांना निवेदन देऊन प्रकल्पाला विरोध केला.
यावेळी निवेदनात म्हटले आहे की, कचरा प्रकल्प हा येथील महादेव मंदिराच्या जवळ होत आहे. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य नष्ट होते. शिवाय गावाला गायरानसाठी जागा कमी आहे. याचबरोबर या भागात लोंढा, मोहिशेत ही मोठी गावे आहेत. याठिकाणी कचरा डेपो प्रकल्प राबवा. याआधी तहसीलदारांना याबाबत सुचना करून निवेदन सादर केले आहे. मिराशी वाटरे गावाच्या हद्दीत कचरा डेपो प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाचा स्विकार तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी प्रकाश हल्लणावर यांनी घेऊन सरकारकडे पाठवून देण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते श्री साईकृष्ण प्रतिष्ठानचे संस्थापक के. पी. पाटील, गणपत गावडे, ग्रामस्थ चुडाप्पा मिराशी, उमाकांत गावडे, यशवंत मिराशी, विठ्ठल मिराशी, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात चोरी!
Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील लक्ष्मी मंदिरात काल रात्री चोरी झाली असून …