
खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी येथे 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सी एस कदम सर होते.
उपस्थितांचे स्वागत रोपटे देऊन करण्यात आले. या निमित्ताने प्रास्ताविकेतून श्रीमती वर्षा चौगुले टीचर यांनी पर्यावरण प्रदूषण व प्लास्टिकचा होणारा वापर यावर विवेचन केले व विद्यार्थ्यांच्या पर्यावरण संरक्षणाबद्दलची जागृती केली. यानंतर एस.आय. काकतकर, एन.व्ही. पाटील व सी आर पाटील सर यांचीही मार्गदर्शने झाली. विद्यार्थ्यांच्या वतीने कुमारी नेत्राली राऊत हिने पर्यावरण दिनाबद्दल माहिती सांगितली. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पर्यावरण जागृती संदर्भातील चित्रे रेखाटली.
अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापक म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या या पिढी दर पिढीमध्ये ही पर्यावरण संरक्षणाची जागृती होणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठीच विद्यार्थ्यांनी स्वतःहून पर्यावरणाकडे जागृतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी आपण एक तरी झाड लावू अशी प्रतिज्ञा घेतली व पर्यावरणात आपला मोलाचा वाटा उचलण्यास कटीबद्धता दाखवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ए. जे सावंत सर व आभार टी .बी. मजगावी यांनी मांडले.
Belgaum Varta Belgaum Varta