Tuesday , March 3 2026
Breaking News

अस्वलाच्या हल्ल्यात जखमी चंदगडचा इसम जखमी

Spread the love

 

रामनगर : चंदगड तालुक्यातील एक इसम रामनगर नजीक आपले नातेवाईकाच्या घरी तिंबोली येथे पायी चालत जात असताना रायशेत दरम्यान अचानक अस्वलाने हल्ला केल्याने एक इसम गंभीर झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. जखमी झालेल्या इसमाचे नाव विष्णू तानाजी शेळके वय 72 राहणार मावळणगी, चंदगड जिल्हा कोल्हापूर असे आहे.

याबाबत मिळालेली माहिती की, तिंबोली येथे नानू थोरात या पाहुण्यांच्या गावी गेलेल्या नातवाला आणण्यासाठी ते रामनगर येथून तिंबोली पायी जात असताना अचानक हल्ला केला. या हल्ल्यात विष्णू शेळके यांचा एक डोळा व एक हाताचे बोट निकामी केले व त्यांना गंभीर केले अस्वलावर प्रतिकार करून कशीबशी त्यांनी तिथून सुटका करून घेतली पण त्या ठिकाणी कोणीच नसल्याने जखमी अवस्थेत विष्णू पायी एक किलोमीटर चालत जात होता. यावेळी इतर नागरिकांनी पाहून त्याला 108 रुग्णवाहिका मधून रामनगर येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी बेळगाव येथे नेण्यात आले. सदर घटनेची नोंद रामनगर पोलीस स्थानकात झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी

Spread the love  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *