Wednesday , March 4 2026
Breaking News

मराठी प्रेरणा मंचच्यावतीने उद्या खानापुरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील मराठी माध्यम शाळातील, दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव, बेळगाव येथील प्रेरणा मंचच्यावतीने मंगळवार दि. ४ जुलै रोजी दुपारी ३ वा. ताराराणी हायस्कूलच्या सभागृहात करण्यात येणार आहे.
दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविलेल्या अनुक्रमे पहिल्या सात विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकासाठी १० हजार रुपये, द्वितीय क्रमांक ५ हजार रुपये, तृतीय क्रमांक ३ हजार रुपये, चौथा क्रमांक २ हजार रुपये, पाचवा क्रमांक १ हजार रुपये, सहाव्या आणि सातव्या क्रमांकासाठी प्रत्येकी पाचशे रुपये व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या. पारितोषिकासाठी संचिता शरद पाटील ताराराणी हायस्कूल खानापूर ६०६ गुण मिळवून प्रथम क्रमांक, श्रीनाथ वसंत सावंत राजश्री शाहू हायस्कूल ओलमणी ५९६ गुण मिळवून द्वितीय क्रमांक, सृष्टी संजय पाटील श्री माउली हायस्कूल गर्लगुंजी ५९५ गुण मिळवून तृतीय क्रमांक, विवेक संजय पाटील मराठा मंडळ हायस्कूल खानापूर ५९४ गुण चौथा क्रमांक, लक्ष्मी निवृत्ती पाटील छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हलशी ५९१ गुण पाचवा क्रमांक, प्राची प्रकाश चव्हाण ज्ञानेश्वर विद्यालय लोकोळी ५९१ गुण पाचवा क्रमांक, दीक्षा दिनेश वाळवे ताराराणी हायस्कूल खानापूर ५८९ गुण सहावा क्रमांक आणि इंद्रायणी महेश पाटील श्री माउली गर्ल्स हायस्कूल गर्लगुजी ५८८ गुण सातवा क्रमांक या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. अधिक माहितीसाठी मराठी प्रेरणा मंचचे अध्यक्ष प्रा. डॉ. गोपाळ पाटील व मंचचे सचिव अरुण कदम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मराठी प्रेरणा मंचच्यावतीने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *