आम आदमी पक्षाच्यावतीने निवेदन सादर
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळातून जवळपास 300 हून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
तालुक्यातील काही प्राथमिक मराठी शाळेत एकच कन्नड शिक्षक आहेत. काही शाळेत अतिथी शिक्षक आहेत. त्यामुळे मराठी शाळेचा शैक्षणिक दर्जा खालवला आहे. याला जबाबदार कोण? तेव्हा तालुक्यात शिक्षकांची नेमणूक करून शैक्षणिक हेळसांड थाबवा. अशा मागणीचे निवेदन आम आदमी पक्षाच्यावतीने शनिवारी दि. 30 रोजी बीईओ कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
यावेळी बीईओ कार्यालयाचे मॅनेजर प्रकाश होसमनी यानी निवेदनाचा स्विकार करून निवेदन शिक्षण खात्याला देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आम आदमी पक्षाचे खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत मेदार, लबीब शेख, सेक्रेटरी शिवाजी गुंजीकर, गोपाळ गुरव, मोहन मुळिक, प्रभाकर पाटील, रमेश कौंदलकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
टेनिस हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी मराठा मंडळ ताराराणी कॉलेजच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय निवड
Spread the love खानापूर : मराठा मंडळ ही शिक्षण संस्था क्रीडा स्पर्धेत खेळाडू विद्यार्थ्यांना नेहमीच …