
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावच्या सर्वे नंबर ३१६ मधील दोन एकर जमिनीतील नारायण दत्ताजीराव पाटील यांच्या मालकीच्या फळ बागेला शाॅकसर्किटमुळे आग लागून लाखोचे नुकसान झाले. यासंदर्भात बागायत खात्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली असता. बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांनी हेस्काॅम खात्याकडे बोट करून आपली जबाबदारी झटकली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गर्लगुंजी येथील नारायण दत्ताजी पाटील यांच्या मालकीची सर्वे नंबर ३१६ मधील दोन एकर जमिनीतील फळ बागेला मार्च महिन्यात शाॅर्टसर्किटमुळे लागल्याने लाखोचे नुकसान झाले. ऐन फळ लागवडीच्या हंगामात नुकसान झाले. याबागेत आंबा, काजु, चिक्कू, नारळ आदी फळाची झाडे होती.
नुकसान होताच गर्लगुंजी गावचे तलाठी, खानापूर पोलिसांनी झालेल्या नुकसानीची नोंद करून घेतली आहे.
तसेच तहसील कार्यालयात झालेल्या नुकसानीची नोंद करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर बेळगांव जिल्हाधिकाऱ्यांनी घटनेची माहिती लेखी स्वरूपात देऊन त्यानी खानापूर बागायत खात्याला नुकसान भरपाईचा आदेश दिला आहे. तरी सुध्दा खानापूर बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. आता त्यानी हेस्काॅम खात्याकडे बोट केल्याने तसेच उडवा उडवीत उत्तरे दिल्याने नुकसानग्रस्ताला अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही
तेव्हा बळीराजाला सरकारकडून मदतीचा हात मिळत नाही. त्यामुळे बळीराजाला दाताच नाही.
एकीकडे सरकार शेतकऱ्यांना सवलतीची अशा दाखवतात. मात्र अधिकारी त्याच शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करते. तेव्हा गर्लगुंजीच्या नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांला नुकसान भरपाईची मदत मिळाली अशी मागणी गर्लगुंजी भागातील शेतकऱ्यांतुन होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta