खानापूर : खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील मणतुर्गे या गावात मोफतपणे चालविल्या जाणाऱ्या शिकवणी वर्गामध्ये शिकायला येणाऱ्या गावातील सरकारी शाळेमधील गरजू विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपच्या माध्यमातून – ग्रामीण शिक्षण अभियान अंतर्गत शैक्षणिक साहित्याचे वितरण श्री दिलीप नाईक, प्रशांत बिर्जे, अनंत देसाई, अजित पाटील, डॉ प्रकाश बेतगावडा, सुराप्पा पाटी, शकुंतला पाटील या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थीनींनी पुष्पगुच्छ देऊन व गाणे गावून केले, यावेळी मान्यवरांनी आपले मौलिक विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. या कार्यक्रमाला नितेश जैन, जयवंत साळुंखे, ऍड. प्रतिक शिपुरकर, प्रसाद हुली, मनिषा सुभेदार यांची मोलाची मदत झाली.
मणतुर्गे गावातील विद्यार्थी गावातीलच सरकारी शाळेत व माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहेत पण त्यांना अभ्यासात अधिक मार्गदर्शन हवे असल्याने, त्यांनी ही शिकवणी (1 ली ते 8 वी वर्गाची) जोडली आहे. ग्रामीण शिक्षण अभियान अंतर्गत’ ग्रुपचे स्वयंसेवक शिक्षिका (आरती चौगुले-पाटीला) व शिक्षक (मोहन पाटील ) विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रम मोफत शिकवितात, सोबत त्यांच्याकडून गाणी म्हणून घेतात, विद्यार्थ्यांना हस्तकलेचे ज्ञान दिले जाते, येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असे वैविध्यपुर्ण उपक्रम राबविले जातात. त्याचबरोबर राहुल पाटील यांच्यामार्फत सेंद्रिय शेतीच्या बाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते, जेणेकरून देशाच्या भावी पिढीला विषमुक्त अन्नधान्य, भाजीपाला व फळफळावळे मिळावीत हा उद्देश तळागाळात रुजावा. सेंद्रिय पिकांच्या उत्पादनाच्या अनुशंगाने विद्यार्थ्यांच्याकडून घरच्याघरी भाजीपाल्याची वा फळझाडांची रोपे तयार करून शेताच्या बांधावर लावण्यासाठी तसेच या रोपांची योग्य प्रकारे निगा राखल्यास आपल्याला ऋतूमानानूसार खाण्यासाठी शेताच्या बांधावरील फळे मोफत उपलब्ध होतील, पर्यावरणाचे रक्षण राखल्याचे समाधानही विद्यार्थ्यांना मिळेल, हा उद्देश यांच्यात रुजविण्यासाठी या स्थानिक शिक्षिकांची मोलाची मदत झाली. या ट्यूशनला सुमारे 50 विद्यार्थी शिकवणीसाठी दररोज येतात. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
Belgaum Varta Belgaum Varta