खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नुतन पदाधिकाऱ्यांची बैठक खानापूर तालुक्याचे माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील व माजी सभापती श्री. मारूती परमेकर यांच्या उपस्थितीत राजा शिवछत्रपती स्मारक येथे सोमवार दिनांक १७ जुलै २०२३ रोजी घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नुतन पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांची जबाबदारी त्यांना सोपाविण्यात आली. १० जुलै २०२३ रोजी झालेल्या निर्णयानुसार नुतन अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील, श्री. निरंजन सरदेसाई, सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी, सहचिटणीस श्री. रणजीत पाटील, खजिनदार श्री. संजीव पाटील, उपखजिनदार श्री. पांडुरंग सावंत, उपाध्यक्ष जांबोटी विभाग श्री. जयराम देसाई, गर्लगुंजी विभाग श्री. कृष्णा कुंभार, लोंढा विभाग श्री. कृष्णा मन्नोळकर, नंदगड विभाग श्री. रमेश धबाले आणि खानापूर शहर विभाग श्री. मारूती देवाप्पा गुरव इत्यादींना पदनियुक्त केले. यावेळी पुढील कार्याची संपूर्ण जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही नुतन पदाधिकाऱ्यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta