खानापूर : खानापूर तालुका हा अतिजंगलाने व्यापलेला तालुका आहे. तसेच विस्तारानेही मोठा आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात घनदाट जंगल त्यातच आठ ते दहा किलोमीटर अंतरावर खेडी. त्यामुळे जंगलातून चालत जाऊन दुसऱ्या गावच्या मतदान केंद्रावर मतदान करताना मतदारांचे हाल होतात. अनेक वयोवृध्द मतदानापासून वंचित राहतात. ही अडचण लक्षात घेऊन तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जवळपास ५० मतदान केंद्रे वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना तहसीलदार प्रकाश गायकवाड म्हणाले की, तालुक्यात आतापर्यंत २५५ मतदान केंद्रे कार्यरत आहेत. मात्र खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक खेडी जंगलात आहेत. अशा खेड्यातील मतदारांना आठ ते दहा किलोमीटरहून जास्त अंतर चालत जाऊन मतदान केंद्रावर मतदान करावे लागते. तेव्हा मतदारांच्या सोयीसाठी जवळपास ५० नवीन मतदान केंद्रावर सोय करण्यासाठी तालुक्यातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी बैठक बोलावली आहे.
खानापूर तालुक्यात २५५ मतदान केंद्रे आहेत. त्यात जवळपास ५० नवीन मतदान केंद्राच्या मंजुरीसाठी आमचे प्रयत्न आहेत. जर नवीन मतदान केंद्रे उपलब्ध झाली तर मतदारांना चालत जाऊन पाच ते दहा किलोमीटर अंतरावर मतदान करणे चुकते. वयोवृद्धाना मतदानाची सोय होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे बोलताना तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.
बैठकीला खानापूर तालुका भाजपचे प्रसार प्रमुख राजेंद्र रायका, भाजपचे तालुका सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव कोळी, श्री टेकडी, प्रकाश मादार, जेडीएस सचिव एल टी बिच्चनावर, शरद होनकांडे, आम आदमी पार्टीचे, बहुजन समाज पार्टीचे नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी तहसील कार्यालयाचे उपतहसीलदार श्री मॅगेरी, ग्रेट टू तहसीलदार के. आर. कोलकार, श्री.
हिरेमठ, सुनिल देसाई आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta