खानापूर : खानापूर तालुका हा अति पावसाचा तालुका अशी ओळख आहे. गेल्या आठवड्यापासून खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने नदी, नाल्यासह, तलावाना पूर आला आहे.
शिवारात पाणीच पाणी झाल्याने सर्वच पीके पाण्याखाली गेली आहेत.
या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागातील खेड्यात घरांना गळती लागुन घराच्या भिंती पडणे, घराचे पत्रे उडून जाणे असे प्रकार घडत आहे.
अशाच प्रकारे भुरूनकी (ता. खानापूर) येथील रहिवासी गोपाळ तिरोडकर, आणि गौसअहमद हेरेकर यांच्या राहत्या घराच्या भिंती कोसळल्याने कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. त्यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. सदर कुटुंबाच्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई मिळवुन देण्यात यावी, अशी मागणी भुरूनकी पीकेपीएस सोसायटीचे अध्यक्ष महेश पाटील तसेच ग्राम पंचायत सदस्य एम. एम. सावकार यांनी केले आहे.