खानापूर : निडगलात (ता. खानापूर) येथील हनुमान मंदिर व बलभीम व्यायाम मंदिराचा स्लॅब भरणी कार्यक्रम नुकताच पार पडला.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लैला साखर कारखान्याचे एम. डी. सदानंद पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य व पीकेपीएसचे चेअरमन नारायण कार्वेकर, पीकेपीएस संचालक शंकर पाटील, रयत मोर्चा अध्यक्ष प्रकाश तिरवीर, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण तिरवीर तसेच बरगांव ग्रा पं अध्यक्षा सौ. चांगुणा पाटील, गावचे निवृत्त शिक्षक महादेव कदम, गणपत पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व फोटो पूजनाने झाली.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हनुमान मंदिर व बलभीम व्यायाम मंदिराच्या इमारतीचा स्लॅब भरणी कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलताना लैला साखर कारखान्याचे एम डी सदानंद पाटील म्हणाले की, आजची पिढी ही व्यसनाधीन होत चालली आहे. मोबाईलचा अतिरेक वाढत चालला. याचा परिणाम त्याच्या शरीरावर होत आहे. व्यायामा पासून दूर गेलेली ही पिढी धर्म रितीरिवाज सोडुन जात आहे. अशा पिढीला व्यायाम ची व भक्ती ची गरज आहे. हे लक्षात घेऊन निडगल गावच्या नागरीकांनी व्यायाम व मंदिर व्हावे. ही तळमळ ठेवून मंदिर उभारले. याची जाणीव नव्या पिढीने ठेवून भक्ती, रितीरिवाज कायम ठेवावे. असे विचार व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवराचा सत्कार करण्यात आले.
कार्यालयला ग्राम पंचायत सदस्य, गावची पंच मंडळी, गावचे नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta