Wednesday , March 4 2026
Breaking News

खानापूर हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे 29 ऑक्टोबर रोजी आयोजन

Spread the love

 

बेळगाव : खानापूर हाफ मॅरेथॉन 2023 स्पर्धा 29 ऑक्टोबर 2023 रोजी मलप्रभा मैदान, खानापूर येथे होणार आहे. तिसऱ्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा एकूण चार गटात होणार असून त्यामध्ये हाफ मॅरेथॉन (21.097 किमी), 10 किमी, 5 किमी आणि 3 किमीची फन रन असणार आहे. या स्पर्धेतील विविध गटातील विजेत्यांसाठी एकूण अडीच लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य खानापूर – जांबोटी रोडवरील मार्गात आव्हानात्मक स्वरूपामुळे या स्पर्धेकडे लोकांचे लक्ष लागून आहे. हाफ मॅरेथॉन श्रेणीतील सर्व फिनिशर्सना एक अनोखी फिनिशर ट्रॉफी दिली जाईल.

सर्व नोंदणीकृत स्पर्धकांना पदके, उच्च दर्जाचा इव्हेंट टीशर्ट, शर्यतीदरम्यान हायड्रेशन सपोर्ट, ई-टाइमिंग प्रमाणपत्र, फ्री रेस डे पिक्चर्स, वैद्यकीय मदत आणि धावल्यानंतर नाश्ता दिला जाईल.

11 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणीमध्ये 10% सूट आहे. https://runindia.in/events/Khanapur-Half-Marathon-2023 वर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *