Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर तालुका समितीच्या वतीने मान्यवरांचा 24 रोजी सत्कार

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगांव जिल्हा आदर्श शिक्षक व निमलष्करी दलात नियुक्त झालेल्या खानापूर तालुक्यातील मराठी तरुणींचा तसेच चांद्रयान-३ २०२३ या मोहिमेत यशस्वी झालेल्या इस्रोचे कनिष्ठ शास्त्रज्ञ श्री. प्रकाश पेडणेकर यांचा सत्कार करण्याचे आयोजिले आहे.

खानापूर तालुक्यातील जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
१) श्री. सुरेश बाबू घुघ्रेटकर (मुख्याध्यापक- मराठा मंडळ हायस्कूल, कापोली)
२) श्री. तुकाराम लक्ष्मण सुतार (मुख्याध्यापक- सह्याद्री हायस्कूल, गोधोळी)
३) श्री. मष्णू विठोबा चोर्लेकर (मुख्याध्यापक- लोअर प्रायमरी मराठी शाळा, मुडेवाडी)
४) श्री. ज्योतिबा शंकर गुरव (मुख्याध्यापक- हायर प्रायमरी मराठी शाळा, मोदेकोप)
५) श्री. पुंडलिक ईश्वर कुंभार (सहशिक्षक- हायर प्रायमरी मराठी शाळा, माळअंकले)
तसेच श्री. महेश विष्णू सडेकर (मुख्याध्यापक- जांबोटी हायस्कूल, जांबोटी) जायन्ट्स ग्रुप ऑफ मेन बेळगांव यांच्या वतीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
तसेच निमलष्करी दलात दाखल झालेल्या कु. रोहिणी मारुती नांदुरकर, लक्केबैल, कु. ललिता जक्काप्पा गुरव, गणेबैल, कु. अश्विनी निंगाप्पा पाटील, खैरवाड, कु. योगिता पोमाणी नाळकर, तिवोली, कु. सोनाली महाराज घाडी, होनकल, कु. अश्विनी भुपतराव देसाई, हेम्माडगा, कु. संयुक्ता गोपाळ गुंडपकर, मास्केनहट्टी, कु. पुजा नारायण हुंद्रे, गर्लगुंजी, कु. राणी नामदेव पाटील, करंबळ, कु. माधुरी मल्लाप्पा अंधारे, यडोगा, कु. मयुरी मल्लाप्पा अंधारे, यडोगा
तसेच वय ७ वर्षे ते १२ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बनवलेल्या ब्रैनोब्रैन या राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय परिक्षेत यश मिळविल्याबद्दल कु. सिध्दी उत्तमराव कदंब-पाटील, गर्लगुंजी हिचा सत्कार करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम रविवार दिनांक २४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथील माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृहात आयोजित केला आहे. तरी या कार्यक्रमासाठी समितीचे कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी आणि तालुक्यातील समस्त मराठीप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव बळवंतराव देसाई, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर गणपतराव पाटील व श्री. निरंजनसिंह उदयसिंह सरदेसाई तसेच सरचिटणीस श्री. आबासाहेब नारायणराव दळवी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!

Spread the love  खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *