बेळगाव : हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्स आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी 10.30 वाजता पार पडणार आहे. स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत असून इच्छुक संघांनी आपली नावे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, अरविंद पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तुकाराम बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, खानापूर तालुका युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, मिलिंद भातकांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला 41 हजार तर उपविजेत्या संघाला 25 हजार व आकर्षक चषक दिला जाणार असून यासह इतरही आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. ही स्पर्धा बेळगाव, खानापूर व इतर भागातील ग्रामीण भागासाठी मर्यादित असून जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Check Also
बोगस आदेश काढून अंगणवाडी भरतीत फसवणूक? : ब्लॉक काँग्रेसकडून चौकशीची मागणी
Spread the love खानापूर : अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार …