बेळगाव : क्रीडा भारती बेळगांव आयोजित क्रीडा स्पर्धा 11 व 12 डिसेंबर रोजी आयोजित करण्याचा निर्णय गुडशेड् रोडवरील क्रीडा भारतीच्या कार्यालयाच्या सभागृहात क्रीडाभारती बेळगावतर्फे घेण्यात आलेल्या पदाधिकार्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धा संत मीरा व जिल्हा क्रिडांगणावर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघाचे विभाग कार्यवाह कृष्णानंदजी कामत व क्रीडाभारती राज्य सचिव अशोक शिंत्रे उपस्थित होते.
प्रारंभी क्रीडा भारती राज्यअध्यक्ष मुकुंद किल्लेकर यांनी उपस्थित सदस्यांचे स्वागत केले, यानंतर अशोक शिंत्रे व विश्वास पवार यांनी क्रीडा भारती पदाधिकार्यांच्या बैठकीत घेण्यात येणार्या अनेक उपक्रमांची माहिती बैठकीत दिली, तसेच जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यात प्रामुख्याने भारतीय खेळाचा समावेश असणार आहे. यात महिलासाठी तसेच शालेय प्राथमिक व माध्यमिक मुली गजगे हा खेळ, प्राथमिक व माध्यमिक मुलांसाठी खुला गट भोगरा, प्राथमिक व माध्यमिक मुले व मुली पोत्यात पाय घालून पळणे, प्राथमिक व माध्यमिक मुले व मुली तिन पायांची शर्यत, ही स्पर्धा अनगोळमधील संत मीरा इंग्रजी शाळेच्या मैदानावर होणार आहे. तसेच खुला गट व माध्यमिक मुले व मुली कब्बडी, व थ्रोबॉल व माध्यमिक मुलें व मुलींसाठी खो-खो, व्हॉलीबाल, थ्रोबॉल तसेच व्हॉलीबॉल ही प्राथमिक मुला-मुलींनासाठी ही स्पर्धा जिल्हा क्रीडांगणावर घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक संघानी आपली नावे विश्वास पवार, उमेश बेळगुंदकर व एन. एन. कातकर यांच्याकडे बुधवार ता. 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नावे नोदवावित, असे आवाहन बेळगांव जिल्हा क्रीडाभारती संयोजक विश्वास पवार व मुकूंद किल्लेकर यांनी केले आहे. या बैठकीला जिल्हा संपर्क प्रमुख गुरूदत्त कुलकर्णी, मोहन पत्तार, व्ही. एस. पाटील, चंद्रकांत पाटील, उमेश बेळगुंदकर, संजीव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
Check Also
विनायक नगर येथे दुचाकी जाळण्याचा प्रकार
Spread the love बेळगाव : विनायक नगर येथे सोमवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास घरासमोर लावण्यात …