बेळगाव : नवहिंद को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. आंतरराज्य या संस्थेतर्फे 2022 या नव्या वर्षासाठी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले आहे. नवहिंद पतसंस्थेच्या वडगांव येथील कार्पोरेट कार्यालयाच्या सभागृहात बुधवार दि. 1 रोजी सायंकाळी दिनदर्शिका अनावरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण, दि. बेळगांव प्रेस ओनर्सचे अध्यक्ष श्रीधर जाधव होते. अॅड. सुधीर चव्हाण व अतिथी श्रीधर जाधव (बापू) नारायण जाधव यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल हुंदरे यांनी केले. व्हा. चेअरमन संभाजी कणबरकर व संचालक पी. एस. मुरकुटे, प्रकाश अष्टेकर, अनिल हुंदरे, संचालिका एस. वाय. चौगुले, न्यू नवहिंद मल्टीपर्पजचे चेअरमन दशरथ पाटील, व्हा. चेअरमन नारायण जाधव, नवहिंद प्रियदर्शनी महिला पथसंस्थेच्या चेअरपर्सन वैशाली मजूकर, व्हा. चेअरपर्सन नम्रता पाटील, नवहिंद महिला प्रबोधन संंघाच्या अध्यक्ष सौ. शुभांगी पाटील, विविध संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते सभासद असि. जनरल मॅनेंजर एन. डी. वेर्णेकर शाखा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालक प्रकाश अष्टेकर यांनी आभार मानले.
